आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Minister Fadnavis When Get Tempered On Agriculture Question

शेतकरी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पारा चढतो तेव्हा...!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - 'सत्तेत येऊन दोनच महिने झाले आणि आम्हाला प्रश्न विचारता? पंधरा वर्षे तुम्ही काय करत होतात? प्रश्न तुम्ही निर्माण केलेत; पण उत्तरे आम्ही देऊ. उसाचा प्रश्न सोडवतो. दुधाचा प्रश्न सोडवतो. साखरेचाही प्रश्न सोडवतो. शेतक-यांनी काळजी करू नये. थोडा वेळ द्यावा,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साेमवारी केले.

मांडवगण फराटा (जि. पुणे) येथे शिरूरचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून भाजपचा आमदार निवडून आला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या ग्रामीण भागात मुख्यमंत्र्यांचा पहिलाच कार्यक्रम होता. फडणवीस यांनी भाषणास सुरुवात केल्यानंतर २-३ श्रोत्यांनी घोषणाबाजी सुरू केली. ऊसदर, दुधावर बोला अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली. 'नरेंद्र-देवेंद्र तुपाशी, शेतकरी उपाशी' असे फलक त्यांनी झळकावले. त्यावर ‘बोलतो बाबांनो, त्याच विषयावर येतोय. थोडे थांबा,’ अशी समजावणीची भाषा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र, सभेत व्यत्यय आणणारे शेतकरी नसून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर मात्र फडणवीस यांचा पारा चढला. "मघाशी ओरडणारे कार्यकर्ते खासगी डेअ-यांचे प्रतिनिधी होते. त्यांना शेतक-यांचे प्रश्न सोडवण्यात रस नाही. त्यांना स्वतःचे फोटो काढायचे होते,' या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.
प्रतिहल्ला चढवताना मुख्यमंत्री म्हणाले, "तुमचे सरकार जे करू शकले नाही ते आमचे सरकार करून दाखवेल. सरकार शेतक-यांना मदत करण्याच्या बाजूचे आहे; परंतु मागच्या सरकारप्रमाणे शेतक-यांना मदत करण्याच्या नावावर खासगी दूध डेअ-यांचा फायदा होऊ देणार नाही. मदतीचे पैसे थेट शेतक-यांच्या खात्यावर देण्यासंदर्भात दुग्धमंत्री एकनाथ खडसे नियोजन करत आहेत.’

मुख्यमंत्र्यांची आश्वासने
ऊस उत्पादकांना ‘एफआरपी' द्यावीच लागेल. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे साखर निर्यातीसाठी अनुदान, कारखान्यांच्या कर्जाची पुनर्रचना, साखरेचा बफर स्टॉक आदी मागण्या केल्या आहेत. लवकरच निर्णय होईल. दूध उत्पादकांच्या नावावर यापूर्वी खासगी डेअ-यांनी १००- १०० कोटी ओरबाडले. आमचे सरकार थेट दूध उत्पादकांच्या खात्यावर पैसे जमा करेल. आठ दिवसांत हा निर्णय होईल.