आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात वडिलांचा अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार; नात्याला काळिमा फासणाऱ्या नराधमास अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 

पुणे- पिंपरी-चिंचवडमधील सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुलगी-वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.अडीच वर्षाच्या मुलीवर 23 वर्षीय वडिलांनी अत्याचार केला आहे. ही घटना ३० नोव्हेंबर रोजी घडली असली तरी नराधम वडिलांनी पुन्हा मुलीवर वक्र दृष्टी ठेवत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलीच्या आईने धाडस दाखवत सांगवी पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी नराधम बापाला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय वडिलांनी अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. मात्र पीडित मुलीच्या आईने धाडस दाखवत सांगवी पोलिसात याप्रकरणी तक्रार दिली आहे. दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता आई, वडील, पीडित मुलगी हे सर्व घरी होते. पीडित मुलीची आई बाथरूममध्ये गेली असता त्यावेळी नराधम बापाने मुलीवर अत्याचार केला. आई बाथरूम मधून बाहेर आल्यानंतर हे सर्व लक्षात आले मात्र पत्नीला जीवे मारण्याची धमकी देत मुलीला रुग्णालयात घेऊन जाऊ नकोस आणि शेजारी काही वाच्यता करू नकोस अशी देखील धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलीची आई पोलिसात गेली नाही. मात्र दुसऱ्या दिवशी देखील पत्नीला मारहाण करत मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, अखेर धास्तावलेल्या आईने धाडस दाखवत सांगवी पोलिसात आठ दिवसानंतर तक्रार दिली. तपास एम.टी.शिंदे या करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...