आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातल्या या बाल कलाकाराने केला नेत्रदानाचा संकल्प; जनजागृतीसाठी पंतप्रधानांना लिहिले पत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड- आर्या घारे या बाल मराठी चित्रपट कलाकाराने दृष्टीहीन मुलां-मुलीसोबत वाढदिवस साजरा केला. त्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. उल्लेखनिय म्हणजे तिने मृत्यूनंतर नेत्रदानाचा संकल्प केला आहे. आर्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यात नेत्रदानाविषयी जनजागृती करावी, असा संदेश लिहिला आहे.

आर्याने भोसरी येथील अंधशाळेत जाऊन आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी तिने नेत्रदानाचा अर्जही भरला. तिने स्वत:च्या डोळ्यावर काळी पट्टी बांधत केक कापला. आर्याने वाढदिवसाच्या आनंद आपल्यासोबत साजरा केल्याने अंध मुलांच्या चेहऱ्यावर वेगळ्‍या प्रकारचा आनंद दिसत होता.

आर्या झळकली होती या सिनेमात...
'देऊळ बंद', 'पोश्टर गर्ल', 'माय इंडिया' अशा मराठी चित्रपटात आर्याने बालकलाकाराच्या रुपात झळकली होती. आगामी सिनेमा 'अबक' या हिंदी चित्रपटात ती दिसणार आहे. आर्या ही अवघ्या नऊ वर्षांची आहे. मात्र तिचे विचार हे मोठ्या-मोठ्यांना लाजवतील असे आहेत. याचाच विचार करत तिने या अंध शाळेत तिने वाढदिवस साजरा केला. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेत्रदान करण्याविषयी जनतेत जनजागृती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

चिमुकल्या आर्याचा जनतेला सवाल...
श्रीलंकेसारखा छोट्या देशातील लोक नेत्रदान करू शकतात तर आपण का करू शकत नाहीत? असा सवाल आर्याने देशातील सर्व जनतेला केला आहे. मृत्यूनंतर सर्वांनी नेत्रदान करावे, असेही आवाहन तिने केले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... बाल कलाकार आर्या घारे हिचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...