पुणे- प्रसिद्ध बालसाहित्यिक राजीव तांबे यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. बालसाहित्यामधील लक्षणीय योगदानासाठी हा पुरस्कार तांबे यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे अकादमीने म्हटले आहे.
तांबे यांनी मुलांचे भावविश्व रेखाटताना आपल्या साहित्यातून बालक-पालक- शिक्षक अशी त्रयी सातत्याने मांडली आहे. ‘माझा हा पुरस्कार मी मुलांनाच अर्पण करतो,’ अशी भावना तांबे यांनी व्यक्त केली आहे. मुलांसाठी तांबे यांनी तब्बल ६९ पुस्तकांचे लेखन केले आहे. मराठीसह हिंदी, इंग्रजी, गुजराती भाषेतही त्यांची पुस्तके अनुवादित झाली आहेत. युनिसेफचे शिक्षण सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)