आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात 11 दिवसांचे बाळ गरम पाण्यात पडल्याने 80 टक्के भाजले; प्रकृती चिंताजनक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो. - Divya Marathi
सांकेतिक फोटो.

पुणे- गरम पाण्यात पडल्याने 11 दिवसांचे बाळ 80 टक्के भाजल्याची घटना घडली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली आहे. या बाळाला तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. 

 

बाळाची आई त्याला शेक देत होती. त्यावेळी ती त्याला तेथे ठेऊन आत गेली आणि त्याच वेळी बाळ अचानक एका अंगावर झाले आणि गरम पाण्याच्या भांड्यात पडले. या घटनेत बाळ गंभीर जखमी झाले. मोहम्मद सगीर शेख (रा. सुमित्रा अपार्टमेंट, भाग्यदोय नगर, कोंढवा) असे बाळाच्या वडिलांचे नाव आहे. बाळ शेकोटीत पडल्यानंतर अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले. पण अग्निशमन दलाचे जवान येण्यापूर्वीच या बाळाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हे बाळ 80 टक्के भाजले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...