आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीचा उपचार केल्याने मुलीचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने पुण्यातील बोपोडी येथील औटी रुग्णालयात एका 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी डॉ.राजेश कुंडलिक औटी यांच्यावर हलगर्जीपणा केल्याबद्दल खडकी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी संजय मधुकर जाधव यांनी डॉ.औटी यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. नऊ जून रोजी मृत मुलीला ताप आल्याने तिला औटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी औटी यांनी तिची तपासणी करून औषधी दिले. यानंतर मुलीला दमा व जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर पुन्हा डॉक्टरने तिच्यावर चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने ती गंभीर झाली. त्यामुळे घाबरलेल्या औटी यांनी तिला रुबी रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.