Home | Maharashtra | Pune | Child kidnap Racket in Pune,

पुणेकरांनो सावधान! तरुणांना भाड्याने रुम देताय; होऊ शकते तुमच्या मुलाचे अपहरण

मोहन दुबे | Update - Sep 28, 2017, 11:15 AM IST

भरदिवसा सात वर्षीय मुलाचे घरासमोरून अपहरण... दोन रात्र तीन दिवस नजर कैदेत.. आणि पन्नास तासानंतर सुटका.... अगदी चित्रपटाल

 • Child kidnap Racket in Pune,
  पिंपरी चिंचवडच्या पूर्णानगर येथून खेळत असलेल्या सात वर्षीय ओम खरातच घरासमोरून दोन तरुणांनी अपहरण केले होते. ओम तब्बल पन्नास तास अपहरणकर्त्यांच्या ताब्यात होता.
  पिंपरी चिंचवड- भरदिवसा सात वर्षीय मुलाचे घरासमोरून अपहरण... दोन रात्र तीन दिवस नजर कैदेत.. आणि पन्नास तासानंतर सुटका.... अगदी चित्रपटाला साजेसे हे अपहरणनाट्य पिंपरी चिंचवडमध्ये घडले आहे. त्यातून सात वर्षीय ओमची सुखरूप सुटका करण्यात आली, मात्र या अगोदर देखील शहरात तीन महिन्यांपूर्वी खंडणीसाठी चार वर्षीय चिमुकलीच अपहरण झाले होते परंतु यात त्या चिमुकलीची अपहरणकर्त्यांनी हत्या केली होती.

  पिंपरी चिंचवडच्या पूर्णानगर येथून खेळत असलेल्या सात वर्षीय ओम खरातच घरासमोरून दोन तरुणांनी अपहरण केले होते. ओम तब्बल पन्नास तास अपहरणकर्त्यांच्या ताब्यात होता. हे अपहरण जणू एका चित्रपटाला साजेसे होते. गाडीतून तोंडाला रुमाल बांधलेले दोन अज्ञात आले आणि त्यांनी साई निवास सोसायटीतील त्यांच्या घरासमोरून ओमला गाडीत घालून ते पसार झाले. काही वेळातच त्यांनी ओमच्या वडिलांना फोन करून,पोलिसांना याबाबत माहिती न देण्याची धमकीही देण्यात आली होती. त्यामुळे ओमचा जीव धोक्यात होता. मात्र पोलिसांनी सर्व सूत्र आणि शक्ती पणाला लावत चारशे पोलिस कर्मचारी कामाला लावले आणि अपहरणकर्त्यांना मुलाला सुखरूप सोडण्यास भाग पाडले. ओमची सुखरूप सुटका झाली. याप्रकरणी दोन तरुणांना अटक देखील करण्यात आली होती. अक्षय जामदारे आणि रोशन शिंदे अस या दोन अपहरणकर्त्यांची नावे आहेत.

  या दोघांची वये हे अनुक्रमे 20 आणि 21 असून विशेष म्हणजे 27 जून 2017 रोजी पिंपरी चिंचवडमधील वडमुख वाडी येथून 4 वर्षीय तनिष्का आरुडे हीचे घरासमोरून भरदिवसा अपहरण झाले होते. यात 20 आणि 22 याच वयोगटातील तरुणांनी खंडणीसाठी तनिष्काचे अपहरण करून हत्या केली होती. या दोन्ही घटना मनाला चटका लावणाऱ्या आहेत. जवळील व्यक्तींनीच घात केल्याचे देखील यात समोर आले आहे. अपहरण 2 लाख रुपयांसाठी करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी तनिष्काची हत्या केली होती. हत्या करून चिमुकलीचा मृतदेह अकोल्यातील मूर्तिजापूर येथे पुरल्याचे आरोपींनी दिघी पोलिसांकडे कबुली दिली होती. यातील एक आरोपी हा आरुडे कुटुंबियांना आर्थिक दृष्ट्या जवळून ओळखत होता. तसेच त्यांच्या इमारतीत भाड्याने राहात होते.

  शुभम जामणिक( 22), प्रतीक साठले (21) असे आरोपींची नावे आहेत. मात्र एका गोष्टीकडे आपण लक्ष दिले तर या दोन्ही घटनेतील आरोपी हे जवळचे असून तरुण व्यक्ती आहेत. ओमच्या अपहरणातील आरोपी हा फिर्यादी यांच्या कडे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. तर शुभम जामणिक हा फिर्यादीच्या इमारतीत भाड्या राहत होता.त्यामुळं या दोन्ही घटनेतील आरोपीना अपहरण करण्यास वेळ लागला नाही, दोघांनीही आर्थिक चणचणीतून अपहरण केले होते. ओमची सुखरूप सुटका करण्यात निगडी पोलिसांना यश आले पण दिघी पोलिसांना तनिष्काला वाचवण्यात यश आले नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. त्यामुळे इथून पुढे कामावर किंवा इमारतीच्या खोली तरुण व्यक्तींना भाड्याने देताना पिंपरी चिंचवडच्या सजक नागरिकांनी विचार नक्कीच करावा.
 • Child kidnap Racket in Pune,
  चिंचवडमधील वडमुख वाडी येथून 4 वर्षीय तनिष्का आरुडे हीचे घरासमोरून भरदिवसा अपहरण झाले होते.

Trending