आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईला वाचवण्यासाठी भावंडं रात्रभर विहिरीत, वाशीमच्या महिलेचा इंदापूरात मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - अाईला अापली मुले प्राणाहून प्रिय असतातच. मात्र, मुलेही जन्मदात्या अाईवर अापल्या जिवापेक्षाही जास्त प्रेम करतात, इतकेच नव्हे, तर तिच्या रक्षणासाठी प्रसंगी स्वत:चा जीवही धाेक्यात घालण्यास मागेपुढे पाहत नाहीत, याची प्रचिती मंगळवारी इंदापूर तालुक्यात अाली. अात्महत्येच्या प्रयत्न करणाऱ्या अापल्या अाईला वाचवण्यासाठी भाऊ- बहिणीनेही विहिरीत उडी घेतली. मात्र, प्रयत्न करूनही दुर्दैवाने ते अाईला वाचवू शकले नाहीत. या दाेघांना मात्र एक रात्र विहिरीतील दगडावर बसून काढावी लागली.
वाशीम जिल्ह्यातील तुलीबुडी (जि. मानाेरा) या छाेट्याशा गावातील राठाेड कुटुंबीय राेजीराेटीसाठी इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर गावाजवळील औद्योगिक वसाहतीत राहत हाेते. तेथे माेलमजुरी करून हे कुटुंबीय अापला उदरनिर्वाह भागवत. मात्र, पांडुरंग व बाईनाबाई या राठाेड दांपत्यात नेहमीच काैटुंबिक कलह हाेत असत. नेहमीच्या त्रासाला कंटाळलेल्या बाईनाबाई साेमवारी रात्री नऊच्या सुमारास जीव देण्यासाठी परिसरात असलेल्या एका विहिरीकडे धाव घेतली. अाईचा हा इरादा लक्षात अाल्याने मुलगा सुमीत (वय १५) व त्याची बहीण संगीता (वय १७) हे दाेघेही बाईनाबाईच्या मागाेमाग धावले. हंबरडा फाेडत दाेन्ही मुलांनी अाईला टाेकाच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या एेकण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या.

मुलांनीही घेतल्या उड्या
मुलांची जराही पर्वा न करता बाईनाबाईंने स्वत:ला विहिरीत झाेकून दिले. तिच्या पाठाेपाठ अाईला वाचवण्याच्या इराद्याने मुलांनीही विहिरीत उडी घेतली. मात्र ते अाईला वाचवू शकले नाहीत. यापैकी फक्त सुमीतला पाेहता येत असल्यामुळे त्याने अापल्या बहिणीला पाण्यातून बाहेर काढत कसेबसे विहिरीतील एका काेपऱ्यात सुरक्षित स्थळी अाणले. बाईनाबाई (वय ४०) यांचा मात्र बुडून अंत झाला. भयभीत बहीण- भावाने विहिरीतील एका दगडावर बसून रात्र काढली.

मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास विहिरीतील कपारी व पाइपच्या अाधाराने सुमीत व त्याची बहीण विहिरीबाहेर पडले. परिसरातील ग्रामस्थांनी त्यांना अाधार दिला. दरम्यान, मृत बाईनाबाईच्या पतीविषयी पाेलिस अधिक माहिती सांगू शकले नाहीत. दरम्यान, पाेलिसांनी महिलेच्या अाकस्मिक मृत्यूची नाेंद केली असून अधिक माहिती घेतली जात अाहे.