पुणे - राज्यात थंडीची हुडहुडी कायम असून अहमदनगर आणि पुणे ही गेल्या आठवडाभरात सर्वाधिक थंड शहरे ठरली आहेत. शनिवारीदेखील राज्यात नगर येथे 5.6 अंश अशा नीचांकी तापमानाची नोंद झाली. पुण्यात 6.8 अंश तापमान नोंदवले गेले. यंदाच्या हिवाळय़ातील हा नीचांक आहे.
वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अनेक भागांत सध्या थंडीची लाट आली आहे. लक्षद्वीप आणि लगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. मात्र उत्तरेकडून येणारे वारे कोरड्या हवामानामुळे थेट पोचत असल्याने राज्यभर गारवा वाढला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत व्यापक घट झाली आहे. कोकण-गोवा आणि मराठवाड्याच्या बर्याच भागात सरासरीच्या तुलनेत पारा घसरला आहे.
दोन दिवस लाट कायम
येत्या 48 तासांतही हवामान मुख्यत: कोरडे राहणार असल्याने पारा सात अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.