आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinchawad Trustee Surendra Maharaj Commits Suicide

चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त सुरेंद्रमहाराज धारणीकर यांची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिंववड (पुणे) चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त सुरेंद्रमहाराज धरणीधर देव यांनी आज (रविवार) पहाटे मंगलमुर्ती वाड्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी सुमारे 9 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिस सखोल तपास करीत आहेत.
नेहमीप्रमाणे रात्री भोजन घेऊन सुरेंद्रमहाराज एकटेच खोलीत झोपले होते. सकाळी सहा वाजता एक साधक त्यांना उठवायला गेला. त्याने अनेकवेळा दार ठोठावले. पण आतून प्रतिसाद मिळाला नाही. सकाळचे नऊ वाजले तरी महाराज बाहेर आले नाही. त्यांचा मुलगा दर्शनने खोलीत डोकावून बघितले तर ते तेथे नव्हतेच. या खोलीच्या वरच्या मजल्यावर अभ्यासिका आणि व्यायामाची स्वतंत्र खोली आहे. त्याचे दार बंद होते. दार तोडले तेव्हा त्यांचा गळफास घेतलेला त्यांचा मृतदेह दिसला.
सुरेंद्रमहाराज यांचे पार्थिव उद्या (सोमवार) सकाळी सात ते नऊ या वेळेत मंगलमुर्तीवाडा येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सकाळी नऊ वाजता चिंचवड गावातील स्मशानभूमित अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पिंपरीमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
2001 पासून सुरेंद्रमहाराज चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त होते. मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेकची मंदिरे या देवस्थानच्या नियंत्रणाखाली येतात. या देवस्थानच्या मालकिच्या अनेक ठिकाणी जमिनी आहेत.