आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्टिहीन दिव्यांशूने दाखवला कॉर्पोरेट विश्वाला ‘प्रकाश’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- आपले दृष्टिहीनत्व आड येऊ न देता देशाच्या प्रगतीतील मोठा वाटा असणार्‍या कॉर्पोरेट विश्वात महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या दिव्यांशू गणात्रा यांच्या कार्याची दखल घेऊन चिराग पुरस्कार जाहीर झाला. दहा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याचप्रमाणे पुण्यातल्या वाहतुकीला शिस्त लावणार्‍या वाहतूक शाखेला व्यावसायिक सेवा पुरस्कारही जाहीर करण्यात आला आहे. रोटरी क्लबच्या वतीने हे पुरस्कार दिले जातात.
दिव्यांशू गणात्रा हे नाव आजच्या भारतीय कॉर्पोरेट शिक्षण क्षेत्रात सुपरिचित आहे. पुणे विद्यापीठाची क्लिनिकल सायकॉलॉजीमधील मास्टर्स पदवी मिळवणारे ते पहिले दृष्टिहीन विद्यार्थी आहेत. काही काळ संगणक क्षेत्रात काम केल्यावर त्यांनी कॉर्पोरेट एज्युकेशन क्षेत्रात यलो ब्रिक रोड या भागीदारी संस्थेमार्फत जागतिक पातळीवर योगदान दिले आहे. त्याबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. पुण्यात दहा जूनला ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.