आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chit Fund Business Men Orgzination Set Up In State

चिट फंड व्यावसायिकांची राज्यस्तरीय संघटना स्थापन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - चिट फंडच्या माध्यमातून पैसे गोळा करून नंतर पोबारा करण्याचे प्रकार महाराष्‍ट्रासह अनेक राज्यांत वाढत आहेत. या गैरप्रकारांना आळा घालण्यास तसेच याप्रश्नी स्थानिक, राज्य आणि केंद्राच्या पातळीवर समस्या मांडता याव्यात यासाठी राज्यस्तरीय चिट फंड व्यावसायिकांची संघटना स्थापन करण्यात आली आहे. संघटनेचे निमंत्रक सी. लक्ष्मीनारायणन यांनी बुधवारी ही माहिती दिली.
या संघटनेचे मुख्यालय पुण्यात असून सध्या 45 कंपन्या सदस्य आहेत. सध्या महाराष्‍ट्रात चिट फंडाच्या माध्यमातून व्यवसाय करणारे 400 व्यावसायिक आहेत. त्यांना केवळ पाच टक्के नफा फरकावर व्यवसाय करावा लागतो. हे प्रमाण सात टक्के असावे, अशी संघटनेची मागणी आहे. केंद्र सरकारच्या चिट फंड कायद्याच्या अखत्यारित या कंपन्या येतात.
संघटनेचे अध्यक्ष व सचिवपदी अनुक्रमे एम. डी. श्रीनिवासन आणि रघू बालन यांची निवड झाली आहे. संघटना स्थापन झाल्याने केंद्राची आर्थिक सर्वसमावेशकतेची योजना चांगल्या प्रकारे राबवता येईल, असे पदाधिका-यांचे मत आहे.