आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाभोळकर हत्याप्रकरणी श्रीरामपूरातून गुंड चन्या बेग चौकशीसाठी ताब्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेक-यांना अटक करण्यात दोन आठवड्यानंतरही पोलिसांना यश आले नसल्याने आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी मात्र ही शक्यता फेटाळली आहे. दरम्यान, श्रीरामपूर (जि. नगर) येथील सराईत गुंड चन्या ऊर्फ सागर अशोक बेग (वय 28) याला लोणीकाळभोर पोलिसांनी या प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर चोरी, मारामारी, गुन्हाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल आहेत.


गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त व तपास अधिका-यांनी सांगितले की, घटनास्थळावर मिळालेली दोन जिवंत काडतुसे व दोन पुंगळ्या फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठवली होती. त्याचा बॅलेस्टिक अहवाल आला आहे. डॉ. दाभोलकर यांच्यावर एकाच पिस्टलमधून गोळीबार करण्यात आलेला आहे. दरम्यान, आरोपींच्या 7756 या क्रमांकाच्या दुचाकीचा राज्यभर शोध घेतला जात आहे. अमरावती जिल्ह्यातील दहा दुचाकींवर संशय असून त्यापैकी आठ मालकांची स्थानिक पोलिसांनी चौकशी केली आहे.