आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिंगरोड प्रश्न चिघळला, पिंपरी चिंचवड महापालिकेवर नागरिकांचा विराट मोर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड- महापालिकेच्या आणि प्राधिकरणाच्या हद्दीतून जाणाऱ्या रिंगरोड साठी हजारो घरांवर हतोडा चालविण्यात येणार आहे. याविरोधात संताप व्‍यक्‍त करत रिंगरोडमध्ये घर जाणाऱ्या हजारो नागरिकांतर्फे आज महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. रिंगरोडसाठी असंख्य घर जाणार असून ही कारवाई होऊ नये, त्याच बरोबर पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण विभाग महापालिकेत विलीन करण्याच्या मागणीसाठी आज महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला.
 
भाजप नेत्यांच्या भाषणांमुळे रिंगरोड बधितांचा प्रश्न आणखी चिघळला आहे. रविवारी झालेल्या भाषणात भाजप नेत्यांनी पुनर्वसन करू असे म्हणताच नागरिकांनी भाजप नेत्यांचा निषेध करत सभा मोडून काढली होती. त्‍याविरोधात आज महापालिकेवर मोठ्या संख्येने मोर्चा काढण्यात आला.  पिंपळेगुरव, थेरगाव, कासारवाडी, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, रावेत गुरुद्वारा या परिसरातील हजारो नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग होता.
 
गेल्या 35 वर्षांपासून राहत असलेल्या नागरिकांचे घर पाडण्यात येणार असल्याने नागरिकांमध्ये संताप दिसून येत होता. आज मोर्चा मध्ये, शस्ती कर रद्द करावा, रिंगरोड रद्द करावा आणि प्राधिकरण विभाग महापालिकेत विलीन करण्‍यात यावा त्याचबरोबर शासनाने काढलेला विकास आराखडा रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

मागील विकास आराखड्यात या रिंगरोडची नोंद होती. परंतु  शासनाने त्‍वरीत ही जागा ताब्यात घेतली नाही. कालांतराने या जागेवर लोकवस्ती वाढत गेली. आज या भागात जवळपास दीड ते दोन लाख लोकांची वस्ती आहे. रिंगरोडमुळे हजारो कुटुंबे रस्त्यावर येणार आहेत. लाखो नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शासनाने रिंगरोडचे काम तात्काळ स्थगित करावे अशी मागणी नागरिकांतर्फे करण्‍यात येत आहे. नागरिकांच्‍या आजच्‍या विराट मोर्चानंतर महापालिका आणि प्राधिकरण प्रशासन काय तोडगा काढणार हे बघन महत्वाचं ठरणार आहे
 
बातम्या आणखी आहेत...