आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जो- तो ज्याच्या-त्याच्या कर्माने मोठा किंवा छोटा होत असतो, सदाभाऊंचा शेट्टींवर निशाणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘राजकारण आणि समाजकारणात कोणीच कोणाला मोठं करत नाही. अथवा संपवतही नाही. जो- तो ज्याच्या-त्याच्या कर्माने मोठा किंवा छोटा होत असतो,’ या माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या वाक्याची आठवण करून देत कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांचे नाव घेता निशाणा साधला.
 
राजू शेट्टी अाणि खाेत यांच्यातील वर्चस्वाचा संघर्ष सध्या सुरू अाहे. या पार्श्वभूमीवर खाेत यांनी पुणे, पिंपरीतील शेतकरी अाठवडी बाजाराच्या उद‌्घाटनप्रसंगी ही प्रतिक्रिया दिली. शेट्टी यांच्या आत्मक्लेश यात्रेसंदर्भात अापण बोलणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या शेतकरी संवाद यात्रेत सहभागी होण्याचेही संकेत मात्र त्यांनी दिले. मोदी यांनी शेतकऱ्यांना फसवले, अशी टीका शेट्टी यांनी केली अाहे. त्याबाबत खोत म्हणाले की, कोण काय बोलते याकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळ नाही. कोणी काय समजावे आणि काय नाही, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. स्पष्ट दिशा ठरवून मी काम करत आहे.’
 
गोदामांसाठी अनुदान
‘राज्यातल्यासात हजार गोदामांमध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल फक्त टक्के आहे. बाकी गोदामे व्यापाऱ्यांच्याच मालाने भरली आहेत. दराअभावी होणारे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी मंडलनिहाय शेतमाल साठवणूक केंद्रे उभारण्यात येत आहेत. यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी महिला बचत गट, विकास सोसायट्यांना ७५ ते ९० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे,’ असे राज्यमंत्री खोत यांनी सांगितले.
 
बातम्या आणखी आहेत...