आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक, 30 तक्रारींनंतर कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- शिक्षक आणि विद्यार्थी या गुरु-शिक्षकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पिंपरीत घडली आहे. विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेच्या शाळेत विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करत असल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केलीआहे. बाळासाहेब आल्हाट असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.  

काय आहे प्रकरण?
- आरोपी बाळासाहेब आल्हाट हा महापालिकेच्या दीनदयाळ उपाध्याय शाळेत मागील 9 वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत आहे.
- भूगोल आणि इंग्रजी विषय तो शिकवतो. आल्हाट याच्या विरोधात वर्गातील विद्यार्थिनी अश्लील चाळे केल्याच्या जवळपास 30 तक्रार दाखल झाल्या आहे.  अशा नाराधमाविरोधात विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करणे, बाल लैंगिक अत्याचार आणि पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा.. कोण आहे हा नराधम शिक्षक?
बातम्या आणखी आहेत...