आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घड्याळ भ्रष्टाचाराने बरबटलेलं, नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - राष्ट्रवादीचे घड्याळ भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे. राज्यातील नगरपालिका भ्रष्टाचारांचे अड्डे बनल्याने काळ्या पैशाने नेत्यांच्या तिजोऱ्या भरल्या. काळ्या पैशावरील नोटाबंदीच्या उताऱ्याने गरिबांच्या तिजोऱ्या सरकार भरेल. बारामतीतदेखील परिवर्तन घडवून जिल्ह्यातील घड्याळाची टिकटिक आम्ही बंद करणार, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली. ते नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारार्थ बारामतीत आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलत होते.
फडणवीस म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांत राज्यातील तीनशे शहरांपैकी एक शहरही हागणदारीमुक्त करता आले नाही. एका वर्षात १०० शहर हागणदारीमुक्त केली. येत्या वर्षाअखेर राज्यातील संपूर्ण शहरे हागणदारीमुक्त करण्याचा सरकारचा संकल्प आहे. कचरा व सांडपाण्याच्या व्यवस्थापनाअभावी शहरांचे योग्य नियोजन न केल्याने रोगराई वाढत आहे. शहरांत मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला. त्यामुळे नगर परिषदेत आम्हाला सत्ता द्या, विकास करून दाखवू, असेही ते म्हणाले.

नोटाबंदीच्या भूकंपाचा धक्का बारामतीला : मंत्री पंकजा मुंडे
बारामती राजकारणातील शक्तिस्थान आहे. बारामती घडतं ते दिल्लीत चर्चिलं जातं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील नोटाबंदीच्या निर्णयाचा बारामतीत धक्का बसला, असा टोला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी काका-पुतण्याचे नाव न घेता लगावला.

घोटाळे केले नसते तर राज्याची ही अवस्था नसती
राज्यात अनेक घोटाळे झाले. घोटाळेबाजांनी घोटाळे केले नसते, तर महाराष्ट्राची ही अवस्था राहिली नसती. सिंचनाचे प्रकल्प होऊन शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळाले असते. मात्र, महाराष्ट्रात घोटाळ्यांची मालिकाच झाली. म्हणून हा भ्रष्टाचार बंद करून काळा पैसा बाहेर काढला पाहिजे, असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...