आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यानंतर नाशकातही CM चे रिकाम्या खुर्च्यांनी स्वागत, नेटिझन्सनी दिले \'पुणेरी टोमणे\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुण्यातील सभेला मिळालेल्या नकारात्मक प्रतिसादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा रद्द केली. तसेच त्यांनी वेळेबाबत गफलत झाल्याचे सांगत सावरण्याचा प्रयत्न केला. पण या फियास्कोनंतर नेटिझन्सच्या तावडीतून मुख्यमंत्री सुटू शकले नाहीत. सोशल मीडियावर या प्रकारानंतर जोरदार ट्रोलिंग सुरू झाले. दरम्यान, नाशकातही पुण्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांना सभेसाठी प्रेक्षकांची वाट पाहावी लागल्याची माहिती मिळाली आहे. 4.30 ची वेळ असूनही सभेला मोजकेच लोक असल्याचे पाहायला मिळाले.
(सोशल मीडियावर आलेले मॅसेज वाचा पुढील स्लाइडवर..)
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदाशिव पेठेतील टिळक रोडवरील सभा पुणेकरांनी पाठ फिरवल्याने सभा रद्द करण्‍याची नामुष्की मुख्यमंत्र्यांवर ओढावली आहे. शनिवारी दुपारी 2 वाजता मुख्यमंत्र्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी मुख्यमंत्री सभेसाठी वेळेत पोहोचले होते. 
 
मुख्यमंत्री येऊन 15 मिनिटे झाले पण, सभेला गर्दीच नसल्याने मुख्यमंत्री स्टेजवर गेले नाहीत. ते स्टेजच्या बाजूलाच खाली थांबले होते. त्यांच्यासोबत पालकमंत्री गिरीश बापट आणि भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले मुख्यमंत्र्यासोबत होते. अखेर सभेला पुणेकरांनी पाठ फिरवल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भाषण न करताच माघारी फिरावे लागले. अखेर आयोजकांनी सभा रद्द केल्याचे जाहीर केले.  
 
काही वेळ थांबूनही गर्दी होत नसल्याचे पाहून, मुख्यमंत्र्यांनी मंचावरच न जाता थेट पिंपरी-चिंचवडकडे जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणूक निवडणूक प्रचाराचा धडाका लावला आहे. ते राज्यभरात सभा घेत आहेत. मात्र, पुण्यात त्यांना वेगळाच अनुभव आला.
 
पिंपरीत राष्ट्रवादीवर कडाडून टीका  
दरम्यान, पुण्यातील सभा रद्द झाल्यानंतर पिंपरी चिंचवड येथे मात्र मुख्यमंत्र्यांच्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला. येथे आंबेडकर पुतळा चौकात मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली. राष्ट्रवादीच्या बंद पडलेल्या घड्याळाला मत देऊ नका, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढवला. भाजपला सत्ता द्या, सध्याच्या तुलनेत पाच पट अधिक विकास करून दाखवतो असे आश्वासनही यावेळी फडणवीस यांनी उपस्थितांना दिले. 
 
नागपुरातही फसली होती पहिली सभा !
नागपुरातही 16 फेब्रुवारीला झालेली मुख्यमंत्र्यांची पहिला सभा फसल्याची चर्चा होती. मुख्यमंत्र्यांच्या या सभेला तोकडी गर्दी होती. पण लोकांपर्यंत माहिती न पोहोचल्याने तसे झाल्याचे तेव्हा सांगण्यात आले होते. 
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा सोशल मीडियावर आलेल्या कमेंट्स आणि मुख्यमंत्र्याच्या रद्द झालेल्या सभेतील रिकाम्या खुर्च्यांचे PHOTOS 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...