आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्‍यमंत्री फडणवीस यांना मुलीने सुनावले; \'कचरा कराल तर सरळ पंतप्रधानांकडे तक्रार करेल\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्‍यमंत्री फडणवीस पत्‍नी अमृता आणि मुलगी दिविजासोबत. - Divya Marathi
मुख्‍यमंत्री फडणवीस पत्‍नी अमृता आणि मुलगी दिविजासोबत.

पुणे- 'कचरा कराल तर सरळ पंतप्रधानांकडे तुमची तक्रार करेल', असे खडे बोल राज्‍याचे मुख्‍यमंत्री फडणवीस यांना त्‍यांच्‍या मुलीने सुनावले आहे. स्‍वत: मुख्‍यमंत्र्यांनीच पुण्‍यातील एका कार्यक्रमात हा किस्‍सा सांगितला. ते म्‍हणाले, 'एकदा मी व माझी मुलगी दिविजा कागदाच्‍या चेंडुने खेळत होतो. खेळता खेळता मी चेंडू तिच्‍याकडे फेकला. तिने चेंडु हातात घेतला आणि रागातच मला म्‍हणाली, 'पप्‍पा, तुम्‍ही अशाप्रकारे कचरा कराल तर मी पंतप्रधानांकडे तुमची तक्रार करेल.' 


रोटरी क्‍लब ऑफ कोरेगाव पार्क आणि जेटी फाऊंडेशनअंतर्गत मुलांमधील लठ्ठपणाविरोधात मोहिम सुरु करण्‍यात आली आहे. गुरुवारी त्‍यासंबंधी पुण्‍यामध्‍ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. तेथे मुख्‍यमंत्र्यांनी उपस्थितांना संबोधित करताना हा किस्‍सा ऐकवला. कार्यक्रमाला त्‍यांचे कुटुंबही उपस्थित होते. 


देशातील पहिले 'हायर औद्योगिक पार्क' 
- मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी पुण्‍यातील रंजनगावे येथे देशातील पहिले हायर औद्योगिक पार्कचे उद्घाटन केले. 
- यानिमित्‍त फडणवीस म्‍हणाले, देशामध्‍ये महाराष्‍ट्र राज्‍याने विदेशी गुंतवणुकदारांना सर्वाधिक आकर्षित केले आहे.  
- या औद्योगिक पार्कमुळे राज्‍याचे उत्‍पन्‍न वाढेल आणि युवकांना रोजगारही मिळतील, असे त्‍यांनी सांगितले. 
- यावेळी मुख्‍यमंत्र्यांसोबत चीनचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी लियांग हौसेनही उपस्थित होते. 

 

कार्यक्रमातील फडणवीस कुटुंबाचे फोटो पाहा, पुढील स्‍लाइडवर.... 


 

बातम्या आणखी आहेत...