आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Fadanvis In Jain International Trade Organization Program

युवा गुणवत्ता विपणनावर देश महासत्तेकडे जाईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - जगातील सर्वात तरुण राष्ट्र म्हणजे आपला देश आहे. कुशल तरुण मनुष्यबळ हे आपले बलस्थान आहे. मात्र, आपल्या तरुणाईच्या गुणवत्तेचे जगभर योग्य विपणन (मार्केटिंग) झाले तरच आपली ‘महासत्ते’कडे वाटचाल होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो)च्या वतीने आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
राज्याचे समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अजय संचेती, अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, ‘जितो पुणे’चे अध्यक्ष विजय भंडारी, चेअरमन राजेश साकला आदी या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "तरुणाईचे ज्ञानकौशल्य, नावीन्यपूर्ण कल्पना, संशोधन महत्त्वाचे आणि गुणवत्तेचे आहे. आपण जगभर त्याचे उत्तम मार्केटिंग करणे आवश्यक आहे.'
नवीपिढी चुकीच्या दिशेने
गोयलम्हणाले, "सध्या समाजात राजकारणात चिंता वाढत आहेत. दहशतवाद, भ्रष्टाचार, पर्यावरणाच्या समस्या आहेत. आज देशातले सुमारे दीडशे जिल्हे माओवाद आणि नक्षलग्रस्त आहेत. या भागाला येथील जनतेला कायम विकासापासून वंचित ठेवले गेल्याने नवी पिढी चुकीच्या दिशेने जात आहे. या पार्श्वभूमीवर कोळसा मंत्रालय मी स्वीकारले तेव्हा ते कमी दर्जाचे मानले गेले; पण मी ती संधी मानली असल्याचे गोयल यांनी सांगितले. त्यामुळेच आज देशात अतिरिक्त कोळशाचा साठा तसेच अतिरिक्त वीज उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळतेच. जैन समाजाचे विकासात मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.
दुष्काळग्रस्तांना मदत
याप्रसंगी ‘जितो’च्या वतीने राज्यातील दुष्काळग्रस्त गावांच्या मदतीसाठी २१ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आला. स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी तो स्वीकारला. तसेच ‘जितो’च्या वतीने राज्यातील ५०० दुष्काळग्रस्त गावे दत्तक घेण्याची घोषणाही करण्यात आली.
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो)च्या वतीने शनिवारी पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.