आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंवरील आरोप तथ्‍यहिन तर त्यांना मंत्रिमंडळातून का काढले, CM ना सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - एकनाथ खडसे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्‍ये कोणत्‍याही प्रकारचे तथ्य नसून, खडसे लवकरच सर्व आरोपांतून मुक्त होतील, असा विश्वास दाखवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंची पाठराखण केली आहे. दरम्यान, खडसे निरपराध असतील तर त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू का देण्यात आला, असा सवाल विचारला जात आहे.
पुण्‍यात आजपासून भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक होत आहे, या वेळी ते बोलत होते. ज्यादिवशी आम्ही भ्रष्टाचार करु, त्यावेळीच पद सोडून घरी जाऊ, असे म्‍हणत टीकाकारांचाही त्‍यांनी समाचार घेतला.
काय म्‍हणाले मुख्‍यमंत्री..
- मुख्यमंत्री म्हणाले, ''सरकारचे काम प्रामाणिक आहे. खडसेंवरील आरोपांत कोणतेही तथ्य नाही.''
- ''MIDC तील जमीन गैरव्यवहार प्रकरणी खडसेंनी राजीनामा दिला आहे. ते चौकशीला सामोरे जात असून, ते लवकरच आरोपातून मुक्त होतील.''
- ''काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी लाटलेले भूखंड आधी परत करावेत, मगच आरोप करावेत.''
- ''भाजपच्‍या मंत्र्यांना विनाकारण टार्गेट केले जात आहे.''
- चौकशीच्या अग्नीपरिक्षेतून नाथाभाऊ यशस्वीरित्या नक्कीच बाहेर येतील, असा विश्‍वासही मुख्‍यमंत्र्यांनी व्‍यक्‍त केला आहे.
राजकीय परिस्थितीवर चिंतन
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक शनिवार व रविवारी पुण्यात होत असून या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चिंतन होणार आहे. याचबरोबर मुंबई, ठाण्यासह राज्यातील प्रमुख महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांची तयारी हा या बैठकीतील प्रमुख विषय असणार आहे.