आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारामती : शरद पवार- मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर, कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती- पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीच्या दौ-यावर आले आहेत. बारामतीतील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राने आजपासून पुढील तीन ( 6 ते 8 नोव्हेंबरदरम्यान) कृषी प्रात्यक्षिके आधारित कृषी पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कृषीमंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री गिरीश बापट, अजित पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित आहेत. पवारांचे सर्व कुटुंबिय कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या प्रदर्शनासाठी आत्मा, नाबार्ड राज्य शासनाच्या कृषी विभागाचे सहकार्य लाभले आहे. या प्रदर्शनाचा राज्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या 110 एकर क्षेत्रावर 10 गुंठ्यांच्या 90 प्लॉटवर कृषी विषयक नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान दाखवण्यात येणार आहे. यात भाजीपाला लागवड, पशुपक्षी व्यवस्थापन, स्वयंचलित खत देणारी प्रणाली, चारा पिके, पॉलीहाऊस, फळप्रक्रिया, बीजप्रक्रिया, कृषी पर्यटन, शेततळी, पाणी देण्याची विविध पद्धती येथे एकाच छताखाली शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे. तसेच या प्रदर्शनात सुमारे 300 कंपन्यांचे स्टॉल्सही लावण्यात आले आहेत. या तीन दिवसीय प्रदर्शनामध्ये 6 नोव्हेंबर रोजी शेतकरी उत्पादक कंपनी, 7 नोव्हेंबर रोजी उच्च तंत्रज्ञान आधारित भाजीपाला उत्पादन तर 8 नोव्हेंबर रोजी कोरडवाहू शेती तंत्रज्ञान या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी राज्यातील सर्व शेतक-यांनी भेट द्यावी, असे आवाहन अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केले आहे.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतक्या चांगल्या प्रकारे व भव्य कृषी प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल राजेंद्र पवार यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री म्हणाले, या कृषी प्रदर्शनातून शेतक-यांनी जगभर जे बदल होताहेत त्याची माहिती घेऊन आपल्या शेतात त्याचा उपयोग केला पाहिजे. राज्यातील शेतक-यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा आमच्या सरकारचा मानस आहे. आपले राज्य कृषिप्रधान होते व यापुढे ते राहील याची काळजी घेतली जाईल. आपल्या शेतक-यांना मोठी संधी असून, महाराष्ट्रात ऊस, डाळी, अन्नधान्यासह नगदी पिके घेऊन देशात अग्रेसर राहण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले.
पुढे वाचा, उद्घाटनप्रसंगी शरद पवार काय म्हणाले...
बातम्या आणखी आहेत...