आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांची पुण्यातील सभा गर्दीअभावी रद्द; ‘सभेच्या वेळेबाबत मिस कम्युनिकेशन\' CM चे ट्विट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका लावणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर शनिवारी पुण्यातील पूर्वनियोजित सभा गर्दीअभावी रद्द करण्याची नामुष्की ओढवली. मुख्यमंत्री व्यासपीठाशेजारी उन्हात उभे आणि मैदानातल्या बहुसंख्य खुर्च्या रिकाम्या, असे चित्र न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणात होते. अखेरीस १५ मिनिटे वाट पाहून मुख्यमंत्र्यांनी ‘सभा रद्द’ असे ट्विट करत पिंपरी-चिंचवडकडे कूच केले.   

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शनिवारी भरदुपारी २ वा. सदाशिव पेठेत मुख्यमंत्र्यांची सभा होती. सव्वादोनला मुख्यमंत्री पोहोचले. आल्याक्षणीच रिकामे मैदान, मोकळ्या खुर्च्या, तळपते ऊन व कार्यकर्त्यांची तुरळक संख्या त्यांच्या लक्षात आली. लोक सोडा, कार्यकर्तेही मोजकेच होते. हा ‘नूर’ पाहून मुख्यमंत्र्यांनी सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसे ट्विट करत पुढची वाट पकडली. ‘सभेच्या वेळेबाबत मिस कम्युनिकेशन झाले,’ असे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले.   
 
पुढील स्लाइडवर वाचा, पुणेरी टोमणे... दुपारी सभा, ही मुभा तर पेशन्यांनाही नाही... 
बातम्या आणखी आहेत...