आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री फडणवीस पुण्यात झाले गुरूजी, शाळेत घेतला पहिलीचा तास, पाहा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाघोलीतील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्यांना \'कसे मिळेल पाणी\' ही कथा सांगून मुख्यमंत्र्यांनी पाणी वाचविण्याबाबत संदेश दिला. - Divya Marathi
वाघोलीतील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्यांना \'कसे मिळेल पाणी\' ही कथा सांगून मुख्यमंत्र्यांनी पाणी वाचविण्याबाबत संदेश दिला.
पुणे- वेळ दुपारी 1 ची तर स्थळ होते पुण्यातील वाघोलीतील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा. वर्ग होता पहिलीचा अन् शिक्षक होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. होय आम्ही बरोबर सांगतोय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुण्यातील एका शाळेत चक्क शिक्षक झाले अन् त्यांनी पहिलीचा तासही घेतला. यावेळी त्यांनी लहानग्या मुलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य दुष्काळाशी सामना करीत असताना 'पाणी कसे मिळेल' हा इयत्ता पहिलीतील बालभारतीच्या पुस्तकातील कथा सांगून आपण पाणी कसे मिळवले, टिकवले पाहिजे याबाबत संदेश दिला. अखेर त्यांना मुलांमधून सुंदर उत्तरे मिळाली अन् क्षणभर मुख्यमंत्रीही हरखून केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्याच्या दौ-यावर आहेत. यादरम्यान त्यांनी पुण्याजवळील वाघोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळा क्र.1 आणि शाळा क्र.2 येथे भेट पहिली व चौथीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार, शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.
पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा आजपासून सुरू झाल्या. आज पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी शाळेत हजेरी लावली. तसेच विद्यार्थ्यांशी शिक्षक या नात्याने संवाद साधला. दुपारी एक वाजता मुख्यमंत्र्यांनी पहिलीच्या वर्गावर हजेरी लावली. यावेळी त्यांनी मुलांना पाणी मिळवणे व वाचवणे याबाबत कथा सांगितली. राज्य सध्या दुष्काळाने हैरान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पहिलीच्या बालभारतीतील पुस्तकातील कसे मिळेल पाणी ही कथा सांगून पाण्याची समस्या आपण कशी सोडवू शकतो व संघटितपणे त्यावर काम केल्यास सर्व परिसर सुजलाफ सुफलाम बनू शकतो असा संदेश दिला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी चौथीच्या वर्गावरील मुलांशी संवाद साधला. त्यानंतर नव्याने शाळेत रूजू झालेल्या विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सर्व मुलांना चॉकलेट वाटप केले. काही वेळातच मुख्यमंत्र्यांच्या वाहनाचा ताफा शाळेतून बाहेर पडला.
पुढे पाहा, कसा संवाद साधला मुलांशी मुख्यमंत्री फडणवीसांनी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)