आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औषधाच्या सीलबंद बाटलीत झुरळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - टॉनिकच्या सीलबंद बाटलीत झुरळ आढळल्याचा प्रकार बारामतीत समोर आला. सात महिन्यांच्या मुलीला सर्दी, डोकेदुखीचा त्रास होत असल्याने बारामतीतील एका नागरिकाने तिला नामांकित बालरुग्णालयात आणले होते. मुलगी अशक्त असल्यामुळे डॉक्टरांनी रक्तवाढीसाठी तिला फरसॉप्ट सिरप व इतर औषधी लिहून दिली. पालकाने दुकानातून औषध खरेदी केले. मात्र, घरी गेल्यावर बाटली उघडल्यानंतर त्यात कीटक आढळून आला. त्यांनी संबंधित कंपनीकडे तक्रार केली. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने मंगळवारी अन्न आणि औषध प्रशासनाकडे तोंडी तक्रार केली. त्याची दखल घेत बाजारात पुरवठा झालेली ही औषधे परत मागवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित औषधाचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून अहवाल आल्यानंतर संबधित कंपनीवर कारवाई करता येईल, अशी माहिती आैषध निरीक्षक दिनेश खिंवसरा यांनी दिली.