आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात आणखी २४ तास राहणार थंडीचा कडाका, हवामान विभागाचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पश्चिमेकडून येणारे थंड वारे व पूर्वेकडील बाष्पयुक्त वारे एकत्र आल्याने राज्यात थंडी परतली आहे. त्यामुळे बहुतेक ठिकाणचे सरासरी तापमान ३ ते ७ अंशांनी घसरले आहे. पुढील २४ तास हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. दरम्यान राज्यात सर्वात कमी ६.३ अंश तापमानाची नोंद नाशिक झाली.

अवकाळी पावसाचे कारण : आग्नेय अरबी समुद्रापासून नैऋत्य मध्य प्रदेशापर्यंत पसरलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीटही झाली. कमी दाबाचा हा पट्टा आता मध्य महाराष्ट्रापर्यंत पसरला आहे. परिणामी सोमवारी विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली. ही थंडी रब्बीच्या पिकांसाठी पोषक मानली जाते.