आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात थंडीची चाहूल; पुण्यात नीचांकी तापमान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राज्यात थंडीची चाहूल लागली असून पुण्यात बुधवारी राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. शहरात बुधवारी पहाटे 14.3 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. त्याखालोखाल अमरावती 14.4, तर परभणी 15.4 यांचा क्रमांक लागला. औरंगाबादेत पारा 16 सेल्सियस अंशावर राहिला.

राज्यात सगळीकडे पारा खाली आला असून बहुतांश भागात किमान तापमान 20 अंशांखाली आले आहे. कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली. उर्वरित ठिकाणी हवामान कोरडे असल्याने थंडीचा बोचरेपणा जाणवत आहे. अन्य शहरांपैकी नांदेड 16.5, नाशिक 16, सोलापूर 18.8, सांगली 19.1, सातारा 16, महाबळेश्वर 15.6 अशी किमान तापमानाची नोंद वेधशाळेने केली आहे. येत्या 48 तासांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून किमान तापमान खालावण्याचा अंदाज आहे.