आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थंड वा-यांची राज्याच्या दिशेने प्रवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - गेल्या दोन दिवसांपासून देशाच्या उत्तरेकडे होणारी बर्फवृष्टी आणि जोरदार पाऊस यांचा परिणाम राज्यात जाणवत असून, किमान तापमानात लक्षणीय घट झाल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे. रविवारी राज्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद निफाड (जि. नाशिक) येथे 6.1 अंश इतकी झाली. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातील प्रचंड बर्फवृष्टीमुळे थंड वारे राज्याच्या दिशेने वाहू लागले आहेत. परिणामी दोन दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस, थंडी आणि गारपीट असे चित्र दिसत आहे. मात्र येत्या 48 तासांत थंडीची लाट कमी होऊन हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

शनिवारी दिवसभर आणि रविवारी पहाटेपर्यंत विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या ब-या च भागात किमान व कमाल तापमानात घट झाली असून तिचे प्रमाण दोन ते सहा अंशांपर्यंत आहे, असे हवामान विभागातील सूत्रांनी सांगितले. गेल्या 24 तासांत प्रमुख शहरातील किमान तापमानाची नोंद पुढीलप्रमाणे - औरंगाबाद - 12.2 अंश, सोलापूर - 16.2, जळगाव -11.7, अहमदनगर - 8.7, नाशिक - 8.6, पुणे - 10.4, मुंबई - 19, अलिबाग - 16, रत्नागिरी - 15.1, कोल्हापूर - 16.8, मालेगाव - 12.5, सांगली - 17, सातारा - 12.2, परभणी - 14, नागपूर - 15.2

महाबळेश्वरात दवबिंदू गोठले
हिल स्टेशन महाबळेश्वरमध्येही थंडी बोचरी झाली असून किमान तापमान 10.5 अंश नोंदवले गेले. येथील वेण्णा तलावात दवबिंदू गोठल्याचे चित्र पहाटेस दिसत होते. गार वारेही दिवसभर वाहत होते.