आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Collage Going Youth & Girl On Raod Agianest Latur Incident, Fight For Right To Love

\'RIGHT TO LOVE\' साठी पुण्यात कॉलेज तरूण-तरूणी रस्त्यावर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- लातुरमध्ये एका युवक व युवतीला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पुण्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आज रॅली काढत स्वत:ला रक्षक म्हणून घेणा-यांचा निषेध केला.
मराठवाड्यातील गनिमी कावा संघटनेने नोव्हेंबरमध्ये फिरायला गेलेल्या युवक-युवतीला मारहाण केली होती. तसेच त्यांचे व्हिडिओ रिकॉर्डिंग करून सोशल मिडियात व्हिडिओ व्हायरल केला होता. दरम्यान, या सा-या घटनेचा निषेध म्हणून गनिमी कावा या संघटनेच्या कार्यकर्त्यांविरोधात महाविद्यालयीन तरूण-तरूणींनी रस्त्यावर उतरुन जोरदार घोषणाबाजी केली.

लातुरात 30 नोव्हेंबर 2014 रोजी ही घटना घडली होती. संबंधित युवक-युवतीला मारहाण केल्यानंतर या समाजकंटकांनी व्हिडीओ व्हॉटसअॅपवर व्हायरल केला होता. मात्र, वृत्तवाहिन्यांनी याबाबतचा प्रकार उघडकीस आणल्यानंतर यातील सहा दोषी आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यात गनिमी कावा संघटनेचा जिल्हाध्यक्ष बालाजी गोडसेसह सहा कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
पुढे वाचा, रॅली आयोजित करण्यामागे काय होता उद्देश...
पुढे छायाचित्राच्या माध्यमातून राईट टू लव्ह निषेध रॅली...