आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेज तरुणांनी पिकवला 200 एकरांवर तांदूळ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्याच्या वेल्हे तालुक्यातील विंझर गावात 220 एकरांवर पुण्यातील कॉलेजात शिकणा-या तरुणाईने गाळलेल्या घामाचे मोती तांदूळ पिकाच्या रूपात दिमाखाने डोलत आहेत. ज्येष्ठ विचारवंत मोहन धारिया यांच्या प्रेरणेने प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ नंदू फडके यांच्या नेतृत्वाखाली 2200 विद्यार्थ्यांनी ही जादू घडवली आहे.

गतवर्षी पावसाळ्यात वनराईच्या वतीने विंझरमध्ये अमृतवर्षा महोत्सव राबवला गेला. ‘एक दिवस शेतासाठी, शेतक-या ंच्या मदतीसाठी’ घोषवाक्य घेऊन विविध कॉलेजांतील 2200 विद्यार्थ्यांनी 220 एकरांवर शेतक-यांच्या मदतीने भातलावणी केली. मनुष्यबळ नसल्याने अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. उपक्रमामुळे मनुष्यबळ मिळून उत्पन्नात 20 टक्के भर पडली. विद्यार्थ्यांना उत्पन्नातील वाटा मिळावा तसेच कृतज्ञता म्हणून तयार पिकातील एक किलो तांदूळ प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात येणार आहे, असे अ‍ॅड. फडके यांनी सांगितले.
शेतक-या ंच्या कष्टाचे भान आले. श्रमाचे महत्त्व कळाले. अन्ननिर्मितीमागे किती मोठी साखळी शेतकरी उभा करत असतो हे समजल्याने अन्न वाया घालवायचे नाही, असे मनोगत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.
उपक्रमाची वैशिष्ट्ये
* विंझर (ता. वेल्हे) गावाची निवड
* कॉलेज विद्यार्थ्यांकडून लागवड
* एकूण 2200 विद्यार्थी सहभागी
* 220 एकरांवर भाताची लावणी
* मनुष्यबळाअभावी उत्पादन घट
* उत्पन्नात 20 टक्के वाढ
* एक दिवस शेतासाठी, शेतक-यांच्या मदतीसाठी हे घोषवाक्य प्रत्यक्षात उतरवले.
यंदा 55 हजार एकरांवर प्रयोग
यंदा पावसाळ्यात 55 हजार विद्यार्थ्यांच्या मदतीने 55 हजार एकर क्षेत्रावर पीक घेतले जाईल आणि त्यापुढील 2014च्या पावसाळ्यात साडेपाच लाख विद्यार्थी यात सहभागी होतील, असा प्रयत्न आहे.’’
अ‍ॅड. नंदू फडके, उपक्रमाचे संयोजक