आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात टोळक्याची विद्यार्थ्यांना मारहाण; तीन आरोपी अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या आवारात घुसून रविवारी दहा ते बारा जणांच्या टोळक्याने 5-6 विद्यार्थ्यांना हॉकी स्टिक व दांडक्यांनी मारहाण केली होती, यात एक जण गंभीर जखमी झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ व सुरक्षा वाढवण्याच्या मागणीसाठी सुमारे 600 ते 700 विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी महाविद्यालयात आंदोलन केले.
दरम्यान, पोलिसांनी किरण सुभाष लोखंडे (वय 30), उमेश अरुण खरात (20) व रोहित अशोक थोरात (20) या तिघांना अटक केली आहे. गंभीर जखमी झालेला विद्यार्थी ज्योतीराम जाधव (22, रा. अकलूज, सोलापूर) याने याबाबत शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.
जाधव हा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. तो एमएस्सी सीईटीची तयारी करत असून रविवारी मित्रांसोबत अभ्यास करत होता. त्या वेळी बाहेरील दोन तरुण तेथे आले व त्यांनी मोबाइलवर मोठय़ा आवाजत गाणी सुरू केली. हा आवाज बंद करण्यावरून हॉस्टेलमधील विद्यार्थी व बाहेरील तरुणांत वाद झाला. याच कारणावरून दहा- ते बारा जणांच्या टोळक्याने हॉकी स्टिक, स्टंप, लाकडी दांडक्याने विद्यार्थ्यांना मारहाण केली. या घटनेत डोक्यात लोखंडी रॉडने वार झाल्याने जाधव रक्तबंबाळ झाला.

प्राचार्यांकडून आश्वासने
प्राचार्य अनिल कारळे यांनी सांगितले की, महाविद्यालयात सुरक्षा वाढवण्यात येईल. 135 सीसीटीव्ही बसवण्याचे काम पूर्ण करण्यात येईल. तसेच जखमी विद्यार्थ्यांचा रुग्णालय खर्च महाविद्यालयातर्फे करण्यात येईल.

महाविद्यालयास टाळे
या घटनेनंतर आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी साडेआठ वाजता आंदोलन सुरू केले. ग्रंथालय बंद पाडून मुख्य इमारतीला त्यांनी टाळे लावले. महाविद्यालय प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. त्यामुळे चार तास प्रशासनाचे काम ठप्प झाले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या तीन गेटवर सुरक्षा रक्षक, नोंदणी वही व टेलिफोन अनिवार्य करण्याची मागणी केली. सर्व गेटवर सीसीटीव्ही, कंपाउंडची दुरुस्ती, मिटकॉन गेटची