आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Commissioner Of Police Sanjay Kumar News In Marathi

निवडणूकांचे मोठे आव्हान : संजयकुमार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - औरंगाबादेत कार्यक्षमतेचा ठसा उमटवणारे, राष्ट्रपती पदक विजेते पोलिस अधिकारी संजयकुमार सोमवारी पुण्याचे सहपोलिस आयुक्त म्हणून रुजू झाले. संजयकुमार सिंघल यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला. पुण्यातील आगामी निवडणुका शांततामय वातावरणात पार पाडणे हे आपल्यासमोरील मोठे आव्हान असल्याचे संजयकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

संजय कुमार हे मुळचे बिहारच्या पालोमा जिल्हयातील. 1989 आयपीएस बॅचचे ते अधिकारी आहेत. राज्यातील अकोला, इचलकरंजी, नांदेड, औरंगाबाद, नागपूर या शहरांत त्यांनी काम केले आहे. 2002 ते 2010 दरम्यान दिल्ली येथे केंद्रीय गुप्तचर खात्यातही त्यांनी काम केलेले आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे वतीने बोसनिया येथे यूएन पर्सनल अधिकारी म्हणून त्यांना एक वर्ष कामाचा अनुभव आहे.

संजयकुमार म्हणाले, पुण्यात यंदा 26 नवीन अधिकारी आले असून, त्यांना आढावा घेऊन काम करण्यास थोडावेळ लागेल. पुण्यातील गुन्हे, अडचणी माहीती घेऊन कामाची दिशा मला ठरवावी लागेल. सोनसाखळी चोर्‍या ही समस्या केवळ पुण्यातील नसून सर्व शहरांमध्ये ती भेडसावत असल्याचेही ते म्हणाले.