आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पानसरे हत्या प्रकरण: मुश्रीफांच्या आरोपांचे 'एटीएस'कडून खंडन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासातून दहशतवादविरोधी पथकास (एटीएस) बाजूला ठेवून विशेष तपास पथकाने (एसआयटी) या प्रकरणाचा तपास करावा, असे माजी पोलिस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांनी बुधवारी कोल्हापूर येथे एका कार्यक्रमात सांगितले होते. मात्र या वक्तव्यास कोणताही आधार नसून त्यांनी दहशतवादविरोधी पथकावर केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण एटीएसने दिले आहे.
कोल्हापूर येथील कार्यक्रमात मुश्रीफ यांनी पानसरे यांच्यावर झालेला गोळीबार आणि त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असताना त्यांना मुंबईत हलवण्याचा घेतलेला निर्णय या दोन्ही गोष्टींचा वेगवेगळा तपास करण्याची गरज असल्याचे सांगितले होते. ज्या प्रवृत्तींनी शहीद हेमंत करकरे, डॉ. दाभोलकर यांना मारले त्यांनीच पानसरेंना ठार केले. या प्रकरणांचा तपास याच विचारसरणीने काम करत असलेल्या एटीएसने जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीकडे वळवला आहे. त्यामुळे एटीएसला तपासापासून बाजूला ठेवा, असे मत मुश्रीफ यांनी व्यक्त केले होते.
बातम्या आणखी आहेत...