आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: अशी दिसेल पुणे मेट्रो, येथे राहतील मेट्रो स्टेशन्स, पुणेरी पगडीत मानाचा तुरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- नागपूर आणि पुणे मेट्रोकडे सध्या राज्याचे डोळे लागले आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि राज्याची उपराजधानी अशी या दोन शहरांची ओळख असल्याने दोन्ही शहरांच्या दळणवळणाला आणि आर्थिक प्रगतीला या प्रकल्पाच्या माध्यमातून चालना मिळणार आहे. पुणे मेट्रोसंदर्भात नाईनएक्सओमीडियाने एक कनसेप्ट्यूअल व्हिडिओ तयार केला आहे.
अशी असेल पुणे मेट्रो
- पुणे मेट्रोत पुणे महानगरपालिका 10 टक्के, राज्य सरकार 20 टक्के, केंद्र सरकार 20 टक्के, तर उर्वरित 50 टक्के रक्कम कर्ज म्हणून घेतली जाईल.
- जपानच्या जायका कंपनीकडून या प्रोजेक्टसाठी अर्थसाहाय्य घेतले जाणार आहे.
- पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पुण्यातील स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड असा ७५ किलोमीटरचा राहणार आहे.
- कोथरुड ते रामवाडी असा १५ किलोमीटरचा दुसरा टप्पा राहणार आहे.
- पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड स्टेशन, तुकारामनगर, भोसरी, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, खडकी, हिलरेंज, शिवाजीनगर, पीएमसी, बुधवार पेठ, मंडई आणि अखेर स्वारगेट असे थांबे राहतील.
- घनदाट लोकवस्ती असलेल्या परिसरात अंडरग्राऊंड आणि इतर ठिकाणी बिम टाकून मेट्रोचा मार्ग तयार केला जाणार आहे.
- या मेट्रो प्रकल्पाला अडीच ते तीन हजार कोटी रुपये खर्च येण्याची शक्तता आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, पुणे मेट्रोचा कनसेप्ट्यूअल व्हिडिओ....
बातम्या आणखी आहेत...