आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसकडून \'गाजर दिखाओ आंदोलन\'; 3 वर्षे पूर्ण करणार्‍या मोदी सरकारचा जाहीर निषेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड- मोदी सरकारला 3 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र देशात आणि राज्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. अशा भाजप सरकारचा पिंपरी चिंचवडमध्ये जाहीर निषेध करत काँग्रेसने 'गाजर दिखाओ आंदोलन' करण्यात आले.

केंद्रात सत्तेवर असलेले मोदी सरकार उद्या, 26 में रोजी 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहे. सत्तेवर येण्यापूर्वी भाजप सरकारकडून नागरिकांना मोठ्या प्रमाणात आश्वासन देण्यात आली होती. मात्र, ती पूर्ण झाली नाहीत. म्हणून पिंपरी चिंचवडमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजप सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. रस्त्यावरील नागरिकांना गाजर वाटून भाजप सरकारने दिलेल्या 'गाजरा'ची पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी गुरुवारी हे आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरातील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचा प्रश्न, रेड झोन हे सर्व अजुनही प्रलंबित आहेत. त्याचबरोबर राज्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहे. तर दुसरीकडे तूर खरेदीचा प्रश्न गंभीर असून मोदी सरकार मात्र गप्प आहे. याचाच निषेध करत भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने हे मोदी सरकार पूर्ण पणे अपयशी ठरले आहे, असे आरोप सचिन साठे यानी केला आहे.
बातम्या आणखी आहेत...