आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस नेत्याकडून अभिनेत्रीची फसवणूक, इतर मुलींनाही फसवण्याचा प्रयत्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित अभिनेत्री स्मिता गोंदकर हिच्याशी लग्नाचे नाटक करून पनवेलमधील काँग्रेसचा माजी नगरसेवक सिद्धार्थ बांठियाने तिच्याकडून दीड वर्ष वेळोवेळी पैसे उकळले. स्वत: स्मिताने शुक्रवारी सिद्धार्थविरोधात पुणे गुन्हे शाखेच्या महिला साहाय्य कक्षात तक्रार दाखल केली आहे. पहिल्या पत्नीपासून दोन मुले असतानाही बतावण्या करीत सिद्धार्थने फसवणूक केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

स्मिताने ‘दिव्य मराठी’ला सांगितले, एका चित्रीकरणादरम्यान मित्राच्या माध्यमातून सिद्धार्थशी ओळख झाली. कालांतराने त्याने मला लग्नाची मागणी घातली. पण याआधी माझा घटस्फोट झाला असल्याने लग्नास मी तयार नसल्याचे त्याला स्पष्ट सांगितले. नंतर आईमार्फत त्याने मला लग्नासाठी राजी केले. चांगला मुलगा असल्याचे सांगून आईने मला लग्नास तयार केले. अखेरीस 23 जुलै 2010 ला आमचे लग्न झाले.

‘आंतरजातीय विवाहाला घरचे परवानगी देणार नाहीत. त्यांना नंतर सांगू,’ असे कारण देत सिद्धार्थने आमच्या लग्नाला त्याच्या घरून कोणीच उपस्थित राहणार नाही याची खबरदारी घेतली. परंतु लग्नानंतर अडीच महिन्यांनी अचानक मला सिद्धार्थच्या पत्नीचा फोन आला. तो विवाहित असून त्याला दोन मुले असल्याचे मला समजले. या वेळी सिद्धार्थने लग्न झाले असले तरी घटस्फोट झाला असल्याची कागदपत्रे दाखवत माझी समजूत काढली.’

प्रमाणपत्रे बनावट
आमच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्याची पार्टी मुंबईत झाली. त्याची छायाचित्रे वर्तमानपत्रातून आल्यानंतर सिद्धार्थची पहिली बायको माझ्या घरी आली. तिने सर्व उलगडा केल्यानंतर घटस्फोटाची कागदपत्रे बनावट असल्याचे लक्षात आले. आमच्या लग्नाचे प्रमाणपत्रही त्याने बनावट केल्याचे लक्षात आले, असे स्मिता म्हणाली. लग्नानंतर सिद्धार्थने चित्रपटांत काम करणे बंद केले.

बांठियावर कारवाई होईल
स्मिताने दिलेल्या माहितीआधारे बांठियाविरोधात दत्तवाडी चौकीत गुन्हा दाखल करण्यात येत असून त्याच्यावर कारवाई केली जाईल. लग्नाची सीडी, पहिल्या बायकोच्या घटस्फोटाची बनावट कागदपत्रे, वैद्यकीय उपचारांची माहिती, लग्नाचे बनावट नोंदणीपत्र आदी पुरावे स्मिताने सादर केले आहेत, अशी माहिती महिला साहाय्य कक्षाच्या पोलिस निरीक्षक स्मिता जाधव यांनी दिली.

पुढील स्लाइडमध्ये, अभिनयाशिवाय काय करते स्मिता...