आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे सरचिटणीस राेहित टिळकला अद्याप अटक नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- काँग्रेसचे सरचिटणीस राेहित दीपक टिळक याच्याविराेधात महिला वकिलाच्या तक्रारीवरून साेमवारी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. त्याच्यापासून अापण गराेदर राहिले असताना त्याने गर्भपात करण्यास भाग पाडले, असेही सदर महिलेने पाेलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले अाहे. दरम्यान,  या प्रकरणी मंगळवारी राेहितला अटक करण्यात अाली नव्हती.

तक्रारदार महिला विवाहित असून एका केसच्या प्रकरणात तिची राेहित याच्याशी अाेळख झाली. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे वचन देऊन  संमतीशिवाय शरीरसंबंध ठेवले व अनैसर्गिक संभाेग केला. तसेच तिने लग्न कर म्हटल्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले अाहे. याप्रकरणी तक्रारदार महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन  कारवाई करण्यात येईल असे विश्रामबाग पाेलिसांनी सांगितले अाहे. 
बातम्या आणखी आहेत...