आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Govt. Should Pass Janlokpal Bill Before Loksabha Anna

जनलोकपाल बिल आणा नाहीतर आणखी दारूण पराभव- अण्णांचा काँग्रेसला इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आम्हाला व जनतेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आता सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात जनलोकपाल विधेयक काँग्रेस सरकारने मंजूर करावे, नाहीतर चार राज्यात झालेल्या दारूण पराभवानंतर लोकसभेतही पक्षाला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागेल, अशा इशारा अण्णा हजारे यांनी आज दिला. सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही म्हणून आपण उद्यापासून पुन्हा जनलोकपालसाठी आंदोलन सुरु करू असेही हजारे यांनी सांगितले.
अण्णा म्हणाले, काँग्रेसने आम्हाला जनलोकपाल विधेयक मंजूर करू सांगितले. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनीही तसे आश्वासन दिले आहे. देशात सगळीकडे भ्रष्टाचार बोकाळलेला असताना योग्य पावले उचलली नाही तर जनता आता सत्ताधा-यांना खाली खेचेल, हे सिद्ध झाले आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. जनलोकपाल हिवाळी अधिवेशनात मंजूर करावेच लागेल. नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या काँग्रेसला राज्या झालेल्या पराभवापेक्षाही मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागेल.
पंतप्रधानांना हिंसा विरोधक विधेयक आणण्याची घाई झाली आहे मग देशात बोकाळलेला भ्रष्टाचार थांबवावा किंवा संपवावा असे वाटत नाही का?. काँग्रेस पक्ष फक्त राजकारण करण्यात गुंतला आहे तसेच त्यांना जनतेचे व देशातील सामान्यांचे काही देणेघेणे नाही असेच म्हणावे लागेल. पंतप्रधानांना जनलोकपाल विधेयक मंजूर करण्याबाबत अनेक पत्रे पाठविली आहेत. याबाबत त्यांना वारंवार आठवण करून दिली आहे. आता सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात जनलोकपाल विधेयत करावे यासाठी मंगळवारपासून आपण राळेगणमध्येच आंदोलनाला बसणार आहोत असेही अण्णांनी सांगितले.