आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलयुक्त शिवारात आधीच पाणी मुरले : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्य सरकार राबवत असलेल्या जलयुक्त शिवारात पाऊस पडून पाणी साठण्या अगोदरच बरेच पाणी अनेक ठिकाणी मुरले आहे. कंत्राट न देता जलयुक्त शिवाराची कामे झाल्याची माहिती समोर आली आहे. यात न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. राज्यात दुष्काळामुळे पाणी प्रश्न गंभीर झाला असून स्फोटक परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी पुण्यात केला.

पुणे श्रमिक पत्रकार संघ आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर, सरचिटणीस योगीराज प्रभुणे उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, राज्यात दोन हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून ही चिंतेची बाब आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत आमूलाग्र बदल न झाल्याने त्यांना सरकारने कर्जमुक्त करावे. उद्योग, गुंतवणुकीत राज्य पिछाडीवर पडले आहे. गुजरातमध्ये गुंतवणूक का जाते याबाबत विवेचन करण्यासाठी सरकार उदासीन असल्याचेही ते म्हणाले.
एमआयएमचा भाजपकडून वापर
भाजप एमआयएमचा वापर सोयीच्या राजकारणासाठी करत आहे. या पक्षाबाबत फारशी चिंता करण्याची गरज नाही. मुस्लिम लीग सुरुवातीला ज्या प्रकारे अल्पजीवी ठरला त्याप्रमाणेच एमआयएमचे अस्तित्व ठरणार आहे. नांदेड महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटवाटपात चुका झाल्यामुळे ज्यांना तिकीट मिळाले नाही ते एमआयएमकडे गेले. एमआयएमचा प्रभाव रोखण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार असेही चव्हाण यांनी या वेळी सांगितले.