आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागा वाटपाचा तिढा, मुख्यमंत्री म्हणतात \'विचार करू\', प्रदेशाध्यक्ष म्हणतात \'चर्चाच नको\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: पृथ्वीराज चव्हाण)
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसची 144 जागांच्या मागणीचा प्रस्ताव काँग्रेसला बिलकुल मान्य नाही. 144 जागांवर राष्ट्रवादी ठाम असेल तर चर्चाच नको अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. मात्र, दोन्ही पक्षाचा सन्मान राखू. कोणताही निर्णय एकतर्फी घेतला जाणार नाही. तसेच जागावाटपाचा तिढा सन्मानपूर्वक व विचाराने सोडवू, तरीही तो सुटला नाही तर स्वबळाचा विचार करू अशी भूमिका घेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आघाडीनेच लढण्याचे संकेत दिले.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसतर्फे पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा पुण्यातील बिबवेवाडीत आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील यांच्या या विभागातील सर्व नेते-पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यात कार्यकर्त्यांची व पदाधिका-यांची मते जाणून घेतल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिका-यांच्या भावना व मते जाणून घेतली. सर्वांना संधी मिळावी यासाठी अनेकांनी स्वबळावर लढविण्याची मागणी केली. त्यांच्या भावना लक्षात घेतल्या जातील. पण धर्मनिरपेक्ष मतांनी विभागणी होऊ नये व जातीयवादी पक्षांना सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी आघाडीचा विचार कायम आहे. बुधवारी आघाडीची समन्वय समितीची बैठक पार पडली. यात राष्ट्रवादीने 144 जागांची मागणी केली. मात्र ही मागणी अवास्तव आहे. तरीही दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते एकत्र येतील व सन्मानपूर्वक जागावाटपाचा तिढा सुटेल अशी आम्हाला आशा आहे. शिवसेनेच्या आंदोलनाची पद्धत चुकीची होती जो प्रकार घडला तो निंदनीय होता. महाराष्ट्र सदनात जेवणाची चांगली व्यवस्था नाही हे मान्य पण हे कृत्य करणे योग्य नाही. याची चौकशीचे आदेश दिले आहेत. धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत मी स्वत सकारात्मक आहे. मात्र, इतर घटकांना विश्वासात घेऊन हा प्रश्न सोडवू असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चव्हाण यांनी सांगितले.
माणिकराव ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादीने 144 जागांची अव्यहवार्य मागणी केली आहे. कालच्या समन्वय बैठकीत त्यांनी 144 जागांची मागणी केल्यानंतर व पुढेही हीच आग्रही भूमिका राहिली तर चर्चाच नको असे राष्ट्रवादीला सांगितले आहे. तरीही अंतिम निर्णय दिल्लीतील आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेतील. मात्र जागावाटपांचा निर्णय राज्य स्तरावरच होईल असे ठाकरेंनी सांगितले.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केली जाईल. दरम्यान 1 ते 5 ऑगस्ट या कालावधीत आघाडीबाबतचा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. नाहीतर सर्वांना संधी मिळेलच असे सांगत काँग्रेस स्वबळावर लढण्यास तयार असल्याचे संकेत दिले.
आघाडी करायची की नाही याबाबत राष्ट्रवादी शनिवारी निर्णय घेणार, वाचा पुढे...