आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress MLA Nimhan Beating Up Retired Commander In Pune

जमिनीच्या वादातून निवृत्त कमांडरला पुण्यात कॉँग्रेसी आमदार निम्हण यांची मारहाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - कॉँग्रेस आमदार विनायक निम्हण यांनी बाणेर येथील एका जमिनीच्या वादातून निवृत्त विंग कमांडर अरुण लक्ष्मण देशमुख यांना मारहाण केली होती. देशमुख यांची पत्नी अंजली देशमुख यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे याबाबत तक्रार दिल्यानंतर, याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्याचे पोलिस आयुक्त गुलाब पौळ यांना दिले आहेत.


निम्हण यांनी बाणेर येथे प्लॉट क्रमांक 93 येथील जमिनीवर 1992-93 मध्ये प्लॉट स्कीम करुन 40 ग्राहकांना विकली. त्यानंतर जमिनधारकांनी सदर जमीन स्वत:च्या नावावर करुन त्याठिकाणी बांधकाम करण्यास सुरुवात केली. मात्र निम्हण यांनी दडपशाहीचा अवलंब करत जेसीबी लावून त्यांची बांधकामे पाडली असा आरोप अंजली देशमुख यांनी केला आहे. देशमुख यांच्या बंगल्याचे काम सुरु असताना निम्हण यांनी सदर जागेवर कंपाउंड टाकून जाण्या-येण्याचा रस्ता बंद केला तसेच पुणे मनपाकडून स्वत:चे प्लॅन मंजूर करुन घेतले. अरुण देशमुख आठ जुलै रोजी सदर जागेवरील बांधकामाच्या ठिकाणी आले असता निम्हण, त्यांचा नगरसेवक मुलगा सनी यांनी देशमुख यांना मारहाण केली होती.
याबाबत चतृश्रृंगी पोलीस चौकीत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिस आयुक्त पळाले
अंजली देशमुख यांनी आमदार निम्हण यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना भेटून केली. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनीही पोलीस आयुक्तांनी सदर प्रकरणी गुन्हा दाखल करावा असे सांगितले. पोलीस आयुक्त गुलाब पोळ सदर बैठक संपवून ‘यशदा’तील हॉलमधून बाहेर पडले असता त्यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गाठले. मात्र माध्यमांची ससेमारी चुकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील एका पोलीस शिपायाच्या गाडीत घाईगडबडीने बसून पसार झाले.