आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाभाेलकर स्मृतिदिन : राज्यात गृह विभागाचे पंधरा वर्षांपासून अस्तित्वच नाही, दलवाईंचा टाेला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्यात गेल्या पंधरा वर्षांपासून गृहमंत्रालयाचे अस्तित्व अाहे की नाही, याबाबत शंका निर्माण होत आहे. या परिस्थितीला पूर्वीचे व अाताचे असे दाेन्ही सरकार जबाबदार आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी गुरुवारी व्यक्त केली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनी आयोजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. या वेळी एन. डी. पाटील, स्मिता पानसरे, डाॅ. हमीद दाभाेलकर, सुभाष वारे, मुक्ता मनाेहर, सुनीता सु. र., डाॅ. भालचंद्र कांगाे, मुक्ता दाभाेलकर उपस्थित हाेते. गेल्या १५ वर्षांपासून राज्यात अाघाडीचे सरकार हाेते व गृहमंत्रालयाचा कारभार काँग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रवादीकडेच हाेता. यानिमित्ताने दलवाई यांनी सध्याच्या भाजप सरकारवर टीका करताना अापल्या पूर्वाश्रमीच्या मित्रपक्षालाही टाेले लगावले अाहेत.
दलवाई म्हणाले, डाॅ. दाभाेलकर यांची हत्या झाल्यानंतर त्यांचे मारेकरी अजूनही सापडत नाहीत ही खेदाची बाब आहे. महाराष्ट्र पाेलिस तपासासाठी सक्षम आहेत. मात्र, यात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव अाहे. गृहमंत्र्यांच्या अावाजाने सर्व पाेलिस अधिकारी हलले पाहिजेत. मात्र, तसे हाेताना दिसत नाही. डॉ. दाभाेलकर, पानसरे यांनी खरे शिवाजी महाराज सांगितले, पण त्यांची हत्या झाली. मात्र, ज्यांनी त्याचे विकृतीकरण केले, त्यांना महाराष्ट्र भूषण िदला जाताे, ही दु:खाची गाेष्ट अाहे. अामची सत्ता असतानाही काही चुका झाल्या. आज त्याची अाम्हाला लाज वाटत अाहे. नागरिकांचे संरक्षण करता येत नसेल, तर पाेलिस अायुक्तांनी जनतेच्या पैशांतून मिळणारा पगार घेऊ नये. केंद्रात नवीन सरकार अाल्यापासून पाकिस्तानची घुसखाेरी वाढली अाहे.
विवेकाचा जागर गतिमान करा
अंनिसचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील म्हणाले, दाभाेलकर, पानसरे यांची हत्या हाेणे ही लाजिरवाणी गाेष्ट अाहे. त्यांचे मारेकरी न्यायालयासमाेर उभे करण्याची जबाबदारी शासनाची आहे. मात्र, त्यात त्यांना यश अाले नाही. हत्येचे सूत्रधार समाजापुढे अाणावेत, अशी शासनाची इच्छा नसल्याची शंका समाजात आहे. राज्यकर्ते बहिरे झाले असतील तर अापला अावाज बुलंद करून त्यांना जाग अाणली पाहिजे. त्यासाठी विवेकाचा जागर अधिक गतिमान व व्यापक करण्याचा प्रयत्न पुढील काळात करावा लागेल.
जातपंचायत विराेधी कायदा असावा
डाॅ. हमीद दाभाेलकर म्हणाले, ‘दाभाेलकरांची हत्या झाल्यानंतर संताप अाला तरी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी विवेक व लाेकशाहीच्या मार्गानेच निषेध व्यक्त केला. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या हत्येनंतर जे शक्य झाले नाही ते दाभाेलकरांच्या हत्येनंतर शक्य झाले. राज्यात कुठेही साधा दगड िफरकला नाही की काच फुटली नाही. मात्र दाेन वर्षांत तपासाची हेळसांड झाली. जादूटाेणाविराेधी कायद्याचा वापर वाढला असून अाता जातपंचायतविराेधी कायदा असावा यासाठी अंनिसची लढाई सुरू अाहे.’
अामचा अाक्राेश अधिक बुलंद करू : डाॅ. शैला
सातारा - दाभोलकर आणि पानसरे यांचे मारेकरी पकडण्यात अपयश अाल्याने शासनाच्या गेल्या दोन वर्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. केवळ शाब्दिक काेलांडउड्या मारण्यात वेळ वाया घालवला जात अाहे. या पार्श्वभूमीवर अाम्ही अामचा अाक्राेश अधिक बुलंद करून विवेकाचा जागर करणार आहोत, असे डाॅ. नरेंद्र दाभाेलकरांच्या पत्नी डाॅ. शैला यांनी गुरुवारी सांगितले. अंनिस व पुरोगामी संघटनांच्या वतीने काढलेल्या माेर्चानंतर अायाेजित सभेत त्या बाेलत हाेत्या. या माेर्चात उदय चव्हाण, डॉ.प्रसन्न दाभोलकर, डॉ.चित्रा दाभोलकर , डॉ. अनिमिष चव्हाण यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी, कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले अाहे की, ‘स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री म्हणून आपणास वेळोवेळी पत्रव्यवहार केला. मात्र अजूनही दाभाेलकर- पानसरेंचे मारेकरी सापडले नाहीत. पंतप्रधानांना भेटण्याचाही प्रयत्न केला मात्र भेट दिली गेली नाही. आमची व्यथा तिथपर्यंत मांडण्यासाठी माेदींशी अामची भेट घालून द्यावी.’