आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Mp Kalmadi & Mla Ramesh Bhagve Helping Me For Loksabha Paigude

काँग्रेसचे खासदार कलमाडी व आमदार बागवेंची मला मदत- दीपक पायगुडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- काँग्रेसचे निलंबित खासदार सुरेश कलमाडी, पुण्यातील काँग्रेसचे आमदार रमेश बागवे यांची मला मदत होत असल्याचा दावा पुण्यातील मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांनी केला आहे. काँग्रेसचे रोहित टिळक यांचीही मला मदत होणार आहे. काँग्रेसमधील काही नेत्यांना मला मदत करण्याशिवाय पर्याय नाही असेही त्यांनी म्हटले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पायगुडे यांनी हा दावा केला आहे.
पायगुडे म्हणाले, पुण्यात मनसेची मोठी ताकद आहे. सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघात मनसेचे व्होट बॅंक आहे. पुण्याची जागा निवडून येणार असल्यानेच राज ठाकरेंनी येथे लक्ष घातले आहे व मला उमेदवारी दिली आहे. मी आता पूर्ण सक्रीय झालो आहे. मी माझ्या हिमतीवर निवडणूक लढत आहे. मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर माझे काम करीत नाहीत हे खरे असले तरी इतर पक्षातून मला मोठी मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेसोबत आपण सेटलमेंट केले असल्याचा दावाही पायगुडे यांनी केला. या सर्व बळावर आपण पुण्याची जागा जिंकणार असल्याचा दावा पायगुडे यांनी केला आहे.
काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम हे पुण्याचे नाहीत. त्यांचे येथे मतदार यादीत नावही नाही. मग असा माणूस खासदार काय होणार असा सवाल करीत कदम आपल्यासाठी तुल्यबळ उमेदवार नाहीत असे सांगितले. भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे आणि मी 1992 साली नगरसेवक होतो. त्यांच्या सर्व बाजू मला माहित आहेत असे सांगत कदम-शिरोळेंपेक्षा आपण सर्वोत्तम उमेदवार असल्याचेही पायगुडे यांनी स्पष्ट केले.