आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cooperative Banking Sector Big Boss To Sucessed To Achive Their Post

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहकारी बॅँकिंग क्षेत्रातील बरखास्त संचालकांनी राखली ‘सत्ता’पदे !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - गैरव्यवहाराच्या कारणावरून सहकारी बॅँकिंग क्षेत्रातून बरखास्त झालेल्या संचालकांनी विधानसभा आणि विधान परिषदेतील बहुमताच्या बळावर सहकारातल्या खुच्र्या कायम राखण्याची काळजी घेतली आहे. सहकार विधेयकातील बदलामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक आमदारांना पुन्हा सहकारी बँकांमध्ये येण्याचा मार्ग खुला झाला आहे.

सहकारातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने सहकार कायद्यात 97 वी घटनादुरुस्ती केली. सहकारी संस्थेच्या संचालक मंडळातून कोणत्याही कारणावरून बरखास्ती झाल्यास संबंधिताला पुन्हा कोणत्याही सहकारी संस्थेच्या निवडणुकीला उभे राहता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण बदल यात होता. रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाने काही वर्षांपासून सातत्याने लावलेल्या तगाद्यामुळे ही सुधारणा करण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारने मात्र विधिमंडळात सहकार विधेयक मंजूर करून घेताना बँकिंग लायसन्स असलेल्या सर्व सहकारी संस्थांना या नियमातून बगल दिली आहे.

सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, ‘सहकार कायद्यातील सेक्शन 78 व सेक्शन 110 यानुसार आतापर्यंत संस्थांच्या संचालकांवर आजवर बरखास्तीची कारवाई होत असे. यातील सेक्शन 110 हे बॅँकिंग लायसन्स असलेल्या सहकारी संस्थांसाठी म्हणजेच राज्य सहकारी बॅँक, जिल्हा सहकारी बँक, अर्बन बँक आदींवरील कारवाईसाठी वापरले जायचे. इतर सहकारी संस्थांसाठी सेक्शन 78 चा वापर होतो.’