आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : लव्‍ह, सेक्सच्‍या स्‍वातंत्र्यासाठी पुण्‍यात रॅली, भेदभावाविरोधात परेड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - कामाच्‍या ठिकाणी आमच्‍यासोबत भेदभाव होतो. तुच्‍छतेची वागणूक दिली जाते. त्‍यामुळे आम्‍हालाही आमच्‍या मनाप्रमाणे प्रेम आणि सेक्‍स करण्‍याचे स्‍वातंत्र्य आणि माणूस म्‍हणून वागणूक दिली जावी, या मागणीसाठी रविवारी LGBT(लेस्बियन, गे, बायसेक्सुअल आणि ट्रांसजेंडर) कम्युनिटीने शहरातून रॅली काढली. यामध्‍ये शेकडो लोक सहभागी झाले होते.
पुणेकर पाहतच राहिले...
> पुण्‍यात काढण्‍यात आलेल्‍या रॅलीकडे अनेक वाहनधारक आपले वाहन थांबून पाहत होते.
> यामध्‍ये 150 च्‍या वर लोक रंग-बिरंगी कपडे आणि हातात बॅनर आणि पोस्टर घेऊन सहभागी झाले होते.
> काहींनी आपला चेहरा रंगवला होता तर काहींनी मास्क घातला होता.
> ही रॅली जे.एम रोडवरून सुरू झाली. फरग्युसन कॉलेज मार्गे स्टार्ट पॉइंटवर तिचा समारोप झाला.
> विशेष म्‍हणजे यामध्‍ये आयबीएम, थ्रो वर्क आणि सिमेंटिकसारख्‍या मोठ्या कंपन्‍यातील काही कर्मचारीसुद्धा सहभागी झाले होते.
> यापूर्वी हैदराबाद आणि बेंगलुरूमध्‍ये या प्रकारची रॅली काढली गेली होती.
> या रॅलीचे आयोजन 'समपथिक ट्रस्ट'ने केले होते.
> या ट्रस्टचे अध्‍यक्ष बिंदू माधव खिरे म्‍हणाले, ''या रॅलीत कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढावा, यासाठी मी विविध कंपन्‍यांच्‍या एचआर प्रमुखांची भेट घेतली.
> या शिवाय माझे मित्र, नातेवाईक यांनाही यात सहभागी होण्‍याचे आवाहन केले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, पुण्‍यात निघालेल्‍या या रॅलीचे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...