आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका पोटनिवडणूक: पुणे, पिंपरीत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- विधानसभा निवडणूक लढण्यासाठी राजीनामा दिल्याने झालेल्या महानगरपालिका पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने यश मिळवले आहे. पुण्यात केळेवाडी-रामबाग प्रभागात पुण्याचे माजी महापौर दीपक मानकर यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. मानकर यांनी 3हजार 54 मतांनी विजय मिळवत आपले एकतर्फी वर्चस्व असल्याचे सिद्ध केले.काळेपडळ-महंमदवाडी या प्रभागात झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे फारुख इनामदार यांनी विजय मिळवला. इनामदार यांनी 2387 मतांनी विजय मिळविला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील जिजामाता रूग्णालय प्रभागात झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीचे उमेदवार अरूण टाक यांनी 458 मतांनी विजय मिळवला आहे.
काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या गौतम चाबुकस्वार यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यासाठी राजीनामा दिला होता. विधानसभेत ते शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले. मात्र, त्यांच्या जागेवर शिवसेनेचे उमेदवार व त्यांचे बंधू सुनील चाबुकस्वार यांना तिस-या क्रमांकावर राहावे लागले. चाबुकस्वार विजयी होतील असे बोलले जात होते. मात्र, राष्ट्रवादीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. दरम्यान, निवडणुकीच्या आधीच टाक यांचा जातीचा दाखला बोगस असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे विजय मिळवला तरी त्यांच्यावर न्यायालयीन लढाईची टांगती तलवार कायम राहणार आहे.