आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबियांच्या विरोधामुळे प्रेमीयुगलाचा आत्महत्येचा प्रयत्न, 17 वर्षीय प्रियसीचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- इयत्ता 12 वीत शिकणा-या एका प्रेमीयुगलाने कुटुंबियांकडून होत असलेल्या विरोधाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला. तर, प्रियकरावर हडपसर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
आकाश साखरे (वय 19) आणि योगिता भालेराव (वय 17) अशी या प्रेमीयुगलाची नावे आहेत. या घटनेत योगिताचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला आहे.
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश व योगिता हे वर्गमित्र होते. हे दोघेही हिंजवडीतील न्यू इंग्लिश महाविद्यालयात इयत्ता 12 वीत शिकत होते. या दोघांत काही दिवसातच प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, याची कुणकुण घरच्याला लागली. योगिता व आकाश या दोघांच्याही घरातून त्यांच्या प्रेमसंबंधाला विरोध होऊ लागला. त्यामुळे योगिताचे कॉलेज काही दिवस बंद केले होते. त्यामुळे आकाश चिंताग्रस्त होता. या दोघांवर घरातील मंडळी लक्ष ठेवू लागली. आकाश हिंजवडीत राहयचा तर योगिता मारूंजीत राहत होती. त्यांचे भेटणे बंद झाले. यामुळे आकाश व योगिता निराश होते. वाढत्या विरोधामुळे नैराश्यामुळे या दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी दुपारी या दोघांनी एकत्र येऊन विष प्राशन केले.
या दोघांनी विष प्राशन केल्याचे मित्रांना कळताच त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना कळवले. त्यांनी दोघांना रूग्णालयात दाखल केले. मात्र, गुरुवारी सायंकाळी योगिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आकाशवर हडपसर येथील खासगी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.