आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेशदादांवर अाराेप कायम करा, अण्णा हजारेंच्या बदनामीरणी न्यायालयाचे अादेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - माजी मंत्री सुरेश जैन यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची बदनामी केल्याचे सकृतदर्शनी सिद्ध झाले अाहे. त्यामुळे जैन यांच्यावर या प्रकरणी अाराेप निश्चित करावे, असे अादेश पुण्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शीतल बांगड यांनी साेमवारी दिले. पुढील सुनावणी २८ मार्चला होईल. जळगावातील घरकुल घाेटाळाप्रकरणी जैन सध्या तुरुंगात अाहेत.

या खटल्यात हजारे यांच्या वतीने अॅड. हर्षद निंबाळकर व अॅड.मिलिंद पवार हे बाजू लढवत अाहेत. अॅड.पवार यांनी सांगितले की, ‘जैन यांनी ९ मे २००३ राेजी पत्रकार परिषदेत अण्णा हजारेंवर भ्रष्टाचाराचा अाराेप केला हाेता. तसेच अण्णांविराेधात अापल्याकडे भ्रष्टाचाराचे भरपूर पुरावे असल्याचा दावाही केला हाेता. याबाबत दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्रात व इलेक्ट्राॅनिक्स मीडियात बातम्या प्रसिद्ध झाल्याने अण्णांची माेठ्या प्रमाणावर बदनामी झाली हाेती.’ त्यानंतरही १७ मे २००३ राेजी जैन यांनी पुन्हा वर्तमानपत्रांना मुलाखती देऊन अण्णांवर अाराेप केले हाेते. या प्रकरणी २००३ मध्ये हजारेंनी जैन यांच्याविराेधात पुणे न्यायालयात अब्रुनुकसानीचा फाैजदारी खटला दाखल केला हाेता. या खटल्यात न्यायालयाने काही पत्रकारांसह सात जणांच्या साक्षी नाेंदवल्या हाेत्या. दाेन्हीकडील युक्तिवाद व साक्षीदारांच्या अाधारे जैन यांनी हजारेंची सकृतदर्शनी बदनामीचा गुन्हा केल्याचे सिद्ध हाेत असल्याने त्यांच्यावर दाेषाराेप ठेवण्यात यावे, असे अादेश न्यायालयाने दिले अाहेत.
बातम्या आणखी आहेत...