आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Court Summons Hindu Mahasabha Secy On Suit Against Godse Film

‘नथुराम’चे दिग्दर्शक शर्मा यांना कोर्टाचे समन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - देशभक्त नथुराम गोडसे चित्रपट ३० जानेवारी रोजी प्रदर्शित करणार असल्याचे जाहीर करणारे दिग्दर्शक आणि अखिल भारतीय हिंदू सभेचे सचिव मुन्ना कुमार शर्मा यांना शुक्रवारी न्यायालयाने समन्स बजावले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनिरुद्ध पाठक यांच्या न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली.

पुण्यातील हेमंत बाबूराव पाटील यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. या चित्रपटामुळे समाजात अशांतता निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यावर बंदी घालावी अशी त्यांची मागणी आहे. पाटील यांचे वकील वाजेद खान-बीडकर यांनी सांगितले की, मुन्ना शर्मा यांना लेखी जबाब २० जानेवारी मांडण्यास न्यायालयाने सांगितले आहे. न्यायाधीश के. एम. िपंगळे यांच्या न्यायालयात याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.