PHOTOS: खासदार सीताराम येचुरींच्या उपस्थितीत नरसय्या आडमांचा अर्ज दाखल
7 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर शहर मध्य मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी आडम यांच्या समर्थकांनी दत्त चौकातील पक्षाच्या कार्यालयापासून पदयात्रा काढली.
या पदयात्रेला पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांनी हजेरी लावली. त्यानंतर येचुरी यांच्या उपस्थितीत आडम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे व आडम यांच्यात जोरदार लढत होईल असे बोलले जात आहे.